लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्यांवर सलमान खान भडकला

कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) भारत सरकारनं लॉकडाऊन (Lockdown) ३ मे पर्यंत वाढवलं आहे. त्यामुळे सध्या सर्वच बॉलिवूड स्टार (Bollywood Star) त्यांच्या सिनेमांचं शूटिंग थांबवून घरी बसले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून सर्वजण त्यांच्या चाहत्यांमध्ये या व्हायरसबाबत जनजागृती करण्याचं काम करत आहेत.

अभिनेता सलमान खाननं (Salman Khan) देखील सोशल मीडियावर (social media) आपल्या चाहत्यांसाठी एक संदेश दिला आहे. या व्हिडिओमध्ये तो पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर भडकलेला पाहायला मिळत आहे. यासोबतच त्यानं लोकांना घरात राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. 

https://www.instagram.com/tv/B_Arunbl6nW/?igshid=1n5kvezhzfg85

"व्हायरसचं गांभीर्य समजा"

सलमान खाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यानं सर्वांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. तो म्हणाला आहे की, जेव्हा कोरोना आला त्यावेळी वाटलं होतं एखादा नॉर्मल फ्ल्यू असेल. काही काळानंतर ठीक होईल. पण लॉकडाऊन केल्यानंतर लक्षात आलं की हे प्रकरण खूप गंभीर आहे. या कोरोनानं सर्वांनाच घरी बसवलं आहे. पण अद्याप काही लोक आहेत ज्यांना या व्हायरसचं गांभीर्य समजलेलं नाही.

"घराबाहेर पडू नका"

सलमान हेही म्हणाला की, पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी तुमच्यासाठी काम करत आहेत. त्यांचा त्यात कोणताही स्वार्थ नाही. कदाचित यामुळे त्यांना कोरोना होऊ शकतो. त्यांची कुटुंब सुद्धा सध्या धोक्यात आहेत. ते त्यांची ड्यूटी पूर्ण करत आहेत आणि तुमची ड्यूटी घरी राहण्याची आहे. पण तुम्ही तेवढी सुद्धा पूर्ण करु शकत नाही आहात. उलट तुम्ही त्यांच्यावर हल्ले करता हे चुकीचं आहे. हा रोग जात-पात आणि धर्म बघून येत नाही. त्यामुळे बाहेर पडून तुम्ही विनाकारण त्यांचं जीवन संकटात टाकत आहात.

"जोकरांमुळे आजार पसरला"

काही जोकरांमुळे हा आजारा आपल्या देशात वेगानं पसरत आहे. जर आपण वेळीच सरकारच्या नियमाचं पालन केलं असतं तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असली असती. काही अतिशाहाण्या लोकांमुळे आता पूर्ण देशाला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक तर आपण सर्वजण राहू नाहीतर कोणीच राहणार नाही. आपण डॉक्टर,नर्स, पोलीस या सर्वांचे आभार मानायला हवे. त्यांच्यावर हल्ले करण्याचे हे प्रकार थांबायला हवे, असं त्यानं स्पष्ट केलं.


हेही वाचा

१६ हजार मजुरांच्या पाठिशी भाईजान, 'अशी' केली आर्थिक मदत

किंग खानची पालिकेला पुन्हा मदत, राजेश टोपेंनी मानले आभार

पुढील बातमी
इतर बातम्या