कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशात 21 दिवस लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य विमा आणि वाहन विमा यांचे प्रिमियम भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केली. ज्या विम्याचे प्रिमियम २५ मार्च ते १४ एप्रिल या काळात देय होते. त्यामध्ये २१ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रिमियम न भरल्यामुळे विमा पॉलिसी रद्द होणार नाही.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं की, थर्ड पार्टी वाहन विम्याच्या आणि आरोग्य विम्याच्या प्रिमियम भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे जरी या काळात ग्राहकाने त्याच्या विम्याचे नुतनीकरण केले नाही तर तो विमा रद्द होणार नाही. २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीतील विमा नूतनीकरण देय असलेल्या सर्व विमाधारकांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. या संदर्भात सरकारने शासकीय आदेश जारी केले आहेत.
लॉकडाऊनचा विचार करून सामान्य ग्राहकांचे हित जपण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. या ग्राहकांना २१ एप्रिलच्या आता आपला विमा नूतनीकरण करावा लागेल.
हेही वाचा -