पाचशे, हजार आणि बँडबाजा

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

गोरेगाव - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून अचानक बाद करण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्वांचीच तारांबळ उडालीय. त्यात लग्नसोहळा. अशा परिस्थितीत पैशांची जुळवाजुळव करतानाच वर-वधूच्या कुटुंबीयांच्या नाकीनऊ येतायत. सनईपासून बिदाईपर्यंत सर्वच खर्चाचे वांदे होतायत. साहजिकच अनेक दिवसांपासून केलेल्या तयारीवर ऐनवेळी विरजण पडतंय. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना नाइलाजास्तव हौसेला मुरड घालावी लागतेय. गोरेगांव पश्चिम मोतीलालनगर उदय सोसायटीत राहणाऱ्या राजोरिया कुटुंबावर हीच वेळ आलीये.

कॅटरर्स, बँड, मंडप डेकोरेटर्स, फोटोग्राफर्स,या सर्वांनीच जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिलाय.

मोदींच्या या निर्णयामुळे ज्यांच्या घरात लग्नसमारंभ आहे त्यांचा मात्र चांगलाच बँड वाजलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या