एक्झिट पोल इफेक्ट, सेन्सेक्स ११०० अंकांनी उसळला

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान १९ मे रोजी झाल्यावर प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोल्स दाखविण्यास सुरूवात केली आहे. रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सचा परिणाम शेअर मार्केटवर झाला. सोमवारी सकाळी बीएसईचा सेन्सेक्स ११०० अंकानी, तर निफ्टी २४४.७५ अंकांनी उसळला. सेन्सेक्स ३८ हजार ७०१ वर उघडला होता, तो काहीच क्षणात ३८ हजार ६९४ वर गेला.

एक्झिट पोल्सचे निकाल जाहीर

लोकसभा निवडणुकीच मतदान संपल्यावर विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल्सचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या पोल्सनं भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या एक्झिट पोल्समध्ये २८७ ते ३४० जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोल्सचे निकाल जाहीर झाल्यावर सोमवारी सकाळी ९.३० वाजता शेअर मार्केटनं उसळी घेतली. सेन्सेक्सचा निर्देशांक ९४६ अंकांची उचल खात ३८,८२९ अंकांवर पोहोचला. तसंच, निफ्टी २० अंकांनी वधारला आहे.


हेही वाचा -

अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यावर पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ

पावसाळ्यात डासांची पैदास टाळण्यासाठी एमएमआरसीची विशेष खबरदारी


पुढील बातमी
इतर बातम्या