HDFC ची नेट बँकिंग सेवा मंगळवारीही विस्कळीत

देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची खासगी बँक एचडीएफसीची नेट बँकिंग सेवा कोलमडली आहे. सोमवारी संध्याकाळी विस्कळीत झालेली नेट बँकिंगची सेवा मंगळवारीही सुरू झाली नाही. त्यामुळे बँकेच्या लाखो ग्राहकांना व्यवहार करताना अडचणी आल्या.

सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजल्यापासून एचडीएफसी बँकेचे नेट बँकिंग आणि मोबाइल अॅपची सेवा खंडीत झाली. महिन्याच्या सुरूवातीला बँकेची सेवा कोलमडल्याने पगार, बँक हप्ते आणि इतर बिले चुकवता न आल्याने बँकेचे ग्राहक त्रस्त झाले. मंगळवारीही ही समस्या कायम राहिली. तांत्रिक सेवेत व्यत्यय आल्यानंतर एचडीएफसी बँकेच्या ट्विटद्वारे माहिती देण्यात आली.

 बँकेने ट्विट करत  म्हटलं की,  तांत्रिक अडचणीमुळे काही ग्राहकांना व्यवहार करताना आमच्या नेट बँकिंग  आणि मोबाइल बँकिंग अ‍ॅपमुळे अडचणी येत आहेत. आमचे तज्ञ ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हाला खात्री आहे की लवकरच आमची सेवा पुन्हा उपलब्ध होईल. या आधी एचडीएफसी बँकेने आपले नवीन मोबाइल अॅप सुरू केले तेव्हा व्यवहार करताना ग्राहकांना अडचणी आल्या होत्या. 


हेही वाचा -

डिसेंबरमध्ये ९ दिवस बँकांना सुट्टी, बँक संदर्भातील कामं तात्काळ उरका


पुढील बातमी
इतर बातम्या