टपाल विभागानं लाँच केलं डिजिटल पेमेंट अॅप 'डाकपे'

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि टपाल विभाग (DOP) यांनी नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅप ‘डाकपे’ (DakPay) लाँच केलं. DakPay अ‍ॅप एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आलं. यावेळी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद देखील उपस्थित होते.

या नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅपद्वारे बँकिंग आणि टपालच्या अन्य सेवाही वापरता येतील. गुगल प्ले-स्टोअरवरुन हे अ‍ॅप फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल. डाउनलोड केल्यानंतर नाव, मोबाइल नंबर आणि पिन कोड टाकून अ‍ॅपमध्ये प्रोफाइल बनवावी लागेल. यानंतर तुम्ही तुमचं बँक अकाउंट अ‍ॅपसोबत लिंक करु शकतात. तुम्ही एकापेक्षा जास्त बँकही लिंक करु शकतात. यानंतर युपीआय किंवा अन्य प्रकारे मनी ट्रान्सफर करता येईल. या अ‍ॅपमध्येही युपीआय अ‍ॅपप्रमाणे चार अंकी पिन नंबर क्रिएट करावा लागेल.

‘DakPay’ या अ‍ॅपमध्ये डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय आहे. ‘डाकपे’च्या माध्यमातून ग्राहक डोमेस्टिक मनी ट्रान्सफर अर्थात डीएमटीद्वारे पैसे पाठवू शकतात. व्हर्च्युअल डेबिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून कोणत्याही सेवा किंवा मर्चंटला पैसे पाठवू शकता.

बायोमेट्रिकद्वारे कॅशलेस इकोसिस्टम तयार करण्यात अ‍ॅप मदत करेल. याद्वारे, कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना परस्पर व्यवहार करण्यायोग्य बँकिंग सेवा मिळतील. युटिलिटी बिल देखील तुम्ही भरु शकता.


हेही वाचा

गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

२६४ थकबाकीदारांनी थकवलं बँकांचं १. ०८ लाख कोटींचं कर्ज

पुढील बातमी
इतर बातम्या