विनावापर पीएफ खातेधारकांना मिळणार 8.8 टक्के व्याज

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

मुंबई - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विना वापर खात्यांना सरसकट 8.8 टक्के व्याज देण्याच्या निर्णयाला कामगार मंत्रालयाने मंजुरी दिलीय. ज्या खात्यात सलग 36 महिने कोणतीही रक्कम नसेल अशा खातेधारकांना व्याज दिले जात नव्हते. मात्र आता नव्या नियमानुसार विना वापर खात्यातील रकमेवर व्याज दिले जाणार आहे. जोपर्यंत रक्कम काढण्याबाबत कामगार अर्ज देत नाही किंवा अन्य ठिकाणी नोकरी सुरू करत नाही, तोपर्यंत हे व्याज त्याला मिळणार आहे. नवी नोकरी चालू होताच त्याचे खाते हस्तांतरित केले जाईल. मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खातेधारक जोपर्यंत हवे असेल तोपर्यंत रक्कम जमा करू शकतो. विना वापर खात्यांवर जोपर्यंत सरकारकडून व्याज दिले जात आहे, तोपर्यंत खातेधारक खात्यातून पैसे काढणार नाहीत, त्यामुळे ही सुरक्षित ठेवही आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या