खिशात 500 ची नोट असूनही उपाशी

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

मुंबई - खिशात ५०० रुपयांच्या नोटा असूनही उपाशी राहण्याची पाळी चंद्रपूरहून मुंबईत आलेल्या आनंद दिघे यांच्यावर आली. एवढंच नाही तर त्यांचा परतीचा प्रवास देखील कठीण होऊन बसलाय. नवीन आमदार मनोरा निवास येथील उपहार गृहाच्याबाहेर (कँटीन) सकाळीच 500, एक हजाराच्या नोटा स्वीकारणार नसल्याचं फलक लावण्यात आला होता. त्यामुळे अनेकांकडे पाचशेच्या नोटा असल्यामुळे माघारी परतावं लागलं. शंभरच्या असलेल्या नोटा मंगळवारी रात्रीच ग्राहकांना दिल्यानं आता सुट्टे पैसे नसल्यामुळे हा फलक लावण्यात आल्याचं उपहारगृहाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या