मदर डेअरीकडून लष्कराला 10 लाखांची मदत !

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

मुंबई - देशातील अग्रगण्य दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपनी 'मदर डेअरी'ने सीमेवर देशासाठी हुतात्मा होणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहून भारतीय लष्कराच्या निधीला 10 लाखांची मदत केली आहे. मदर डेअरी फ्रूट अॅंड व्हेजिटेबल्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शिव नागराजन म्हणाले की, जवानांचं देशाच्या सुरक्षेतलं योगदान आपण कधीही विसरू शकत नसल्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. भारत सरकारच्या माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव प्रभू दयाल मीना यांच्याकडे मदर डेअरीकडून 10 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी प्रभू दयाल मीना म्हणाले की, माजी सैनिकांच्या योगदानाचा सन्मान करणं ही चांगली गोष्ट असून मदर डेअरीचं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या