पीएमसी बँकेकडून ठेवींवरील व्याजावर १० टक्के टी़डीएस कपात

मागील एका वर्षापासून पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) आरबीआयने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकेच्या हजारो ठेवींदारांच्या ठेवी अडचणीत आल्या आहेत. आपल्या ठेवी परत मिळतील की नाही या चिंतेत ठेवीदार आहेत. अशा परिस्थितीत पीएमसी बँक ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर १० टक्के टीडीएस कपात आहेत. दंड टाळण्यासाठी बँकेला टीडीएस वेळेवर कर विभागाकडे जमा करायचा असल्याने बँक टीडीएस कापत आहे. 

पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याने खातेदारांना पैसै काढण्यासही निर्बंध आहेत. सध्या खातेदारांना अवघे ५० हजार रुपयेच आपल्या खात्यातून काढता येत आहेत. वर्ष झाले तरी पीएमसी बँकेला तारणारा आणि लाखो ठेवीदारांना दिलासा देणारा तोडगा काढण्यात आलेला नाही. ठेवीदारांनी आरबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्याची योजना आखली होती. मात्र, त्यासाठी आवश्यक परवानगी न मिळाल्याने ठेवीदारांना आंदोलन करता आले नाही. 

या पार्श्वभूमीवर पीएमसीबाबत नेमका तोडगा काढण्यासाठी पीएमसीच्या प्रशासकपदी युनियन बँकेचे माजी महाव्यवस्थापक ए. के. दीक्षित यांची नियुक्ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली आहे. आरबीआयने याआधी पीएमसी बँकेचे प्रशासक म्हणून जे. बी. भोरीया यांची नियुक्ती केली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना ही जबाबदारी पार पाडणं शक्य होत नसल्याने. त्यामुळे त्यांच्या जागी दीक्षित यांची नवे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

मोठा आर्थिक तोटा झाल्यामुळे अडचणीत आलेल्या पीएमसी बँकेला त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि बँकेचे लाखो ठेवीदार व गुंतवणूकदार यांना दिलासा देण्यासाठी आरबीआय सातत्याने प्रयत्न करत आहे.


हेही वाचा -

केकेआर रिलायन्स रिलेटमध्ये गुंतवणार ५५५० कोटी

एसबीआयकडून कर्जदारांना दिलासा, कर्ज पुनर्रचना सुविधा सुरु


पुढील बातमी
इतर बातम्या