आता फ्लिपकार्ट बदलणार? वॉलमार्टनं खरेदी केले शेअर्स!

  • मुंबई लाइव्ह टीम & अखिल गांगण
  • व्यवसाय

ऑनलाईन खरेदीमधलं एक मोठं आणि आपल्या सर्वांच्याच ओळखीचं नाव म्हणजे फ्लिपकार्ट. अॅमेझॉनच्याच धर्तीवर भारतीय ग्राहकांसाठी फ्लिपकार्टची सुरुवात झाली. मात्र, आता फ्लिपकार्ट हे भारतीय राहणार नसून अमेरिकन होणार आहे!

मूळची अमेरिकन कंपनी असलेल्या वॉलमार्टनं फ्लिपकार्ट खरेदी केलं आहे. फ्लिपकार्टचीच भागीदार असलेल्या सॉफ्टबँक कंपनीचे सीईओ मसायोशी सॉन यांनी राऊटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. मंगळवारी रात्री हा करार झाल्याचंही सॉन यांनी सांगितलं.

वॉलमार्टनं घेतले ६०% शेअर्स

यावेळी नक्की काय करार झाला याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, वॉलमार्ट आणि गुगलच्या अल्फाबेट आयएनसी कंपनीने फ्लिपकार्टच्या शेअर्सचा मोठा हिस्सा खरेदी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वॉलमार्टने ६०% तर अल्फाबेटने १५% शेअर खरेदी केले आहेत.

अॅमेझॉननेही दर्शवली होती खरेदीची तयारी!

दरम्यान, ऑनलाईन खरेदी विश्वातील मोठी कंपनी असलेल्या अॅमेझॉननेही फ्लिपकार्टच्या ६० टक्के शेअर खरेदीची तयारी दर्शवली होती. मात्र, हा व्यवहार काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकला नाही.

अॅमेझॉनमध्येच सुरू झाला फ्लिपकार्टचा प्रवास

अॅमेझॉन ही कंपनी १९९६ साली स्थापन झाली होती. फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल अॅमेझॉनमध्येच काम करत होते. २००७ साली अॅमेझॉनसारखीच भारतीय कंपनी सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि फ्लिपकार्टचा जन्म झाला. बन्सल यांच्याशिवाय फ्लिपकार्टमध्ये जपानच्या सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशन, टायगर ग्लोबल, नॅसपर्स आणि अॅक्सिल या कंपन्यांचेही शेअर्स आहेत.


हेही वाचा

मागवला आयफोन, मिळाला साबण

पुढील बातमी
इतर बातम्या