Coronavirus pandemic: मुंबईत 1015 नवे रुग्ण, दिवसभरात 58 जणांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे 120 जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात 1015 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी   दिवसभरात 58 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 61 रुग्ण दगावले आहेत. तर 1 जून रोजी 40 मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी 2 जून रोजी रोजी एकूण 49 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे 1015 नवीन रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता 50 हजार 878 इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात  करोनाचे 904 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण 22 हजार 942 रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

सक्रीय कंटेनमेंट झोन (चाळ)  775

सीलबंंद इमारती 4071

24 तासातील संपर्काचा शोध अति जोखिम  8494

CCC1 मधील अति जोखीम  27,708

CCC1 मध्ये भर्ती असलेले अतिजोखिम 97074

पुढील बातमी
इतर बातम्या