पश्चिम रेल्वेवर 5 एप्रिलपासून आणखी 11 नॉन-एसी गाड्या धावणार

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चर्चगेट ते विरार, डहाणू रोडदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या ११ लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना बुधवारपासून या वाढीव फेऱ्यांतून प्रवास करणे शक्य होणार आहे. यापैका चार लोकल फेऱ्या गर्दीच्या वेळी वाढणार आहेत.

पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकांमध्ये वाढीव लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यासाठी काही लोकलच्या वेळेत काही मिनिटांचा बदल करण्यात येणार आहे. सुधारित बदलदेखील बुधवारपासून लागू होणार आहेत. वाढीव जलद लोकल प्रायोगिक पद्धतीने सुरू करण्यात येणार असल्याने, या फेऱ्या बोरिवली आणि वांद्रे स्थानकांवर थांबणार नाहीत.

वाढीव फेऱ्यांमध्ये पाच धीम्या आणि सहा जलद लोकलचा समावेश आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण फेऱ्यांची संख्या १,३८३वरून १,३९४वर पोहोचणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेवर १२ डब्यांच्या लोकल फेऱ्यांचे १५ डब्यांमध्ये रूपांतर केल्यानंतर सामान्य लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आलेली होती.

अंधेरी ते विरार स्थानकादरम्यान १५ डब्यांच्या लोकल धावण्यासाठी काम पूर्ण झाले आहे. पश्चिम रेल्वेवरील सुरत विभागात रुळांचे अद्ययावतीकरण केल्यामुळे मेल-एक्स्प्रेसचा वेग वाढलेला आहे. मेल-एक्स्प्रेस अधिक जलद गतीने मुंबईत प्रवेश होत असल्याने लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी अतिरिक्त जागा निर्माण होते.

जलद मार्गावर प्रयोगात्मक पद्धतीने थांबे न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, यासाठी काही लोकलच्या वेळेत नाममात्र बदल करण्यात येणार आहे.

नवीन अप लोकल

लोकल – जलद/धीमी – प्रस्थान वेळ

गोरेगाव-चर्चगेट – धीमी – सकाळी ९.४०

विरार-दादर – जलद- सकाळी १०.४२

गोरेगाव-चर्चगेट – धीमी – सकाळी ११.५०

विरार-अंधेरी – जलद – दुपारी १.१४

विरार-बोरिवली – जलद – दुपारी २.४७

नवीन डाऊन लोकल

लोकल – जलद/धीमी – प्रस्थान वेळ

चर्चगेट - गोरेगाव – धीमी – सकाळी ८.३८

चर्चगेट - गोरेगाव – धीमी - सकाळी १०.५१

दादर-विरार – जलद – दुपारी १२.०६

अंधेरी-विरार – जलद -दुपारी २.००

बोरिवली -विरार -जलद – दुपारी ३.२३

चर्चगेट – वांद्रे – धीमी – रात्री ९.५५


हेही वाचा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गिकेवरील मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक रेल्वे स्थानकाला जोडणार

द्रुतगती मार्गानंतर जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा टोल 18 टक्क्यांनी वाढला

पुढील बातमी
इतर बातम्या