पुढचे 5 दिवस पावसाचेच, NDRF च्या 13 टीम तैनात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत शुक्रवारसाठी रेड अलर्ट दिल्यानंतर आणखी एक इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढचे 5 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर NDRF च्या 13 टीम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. पुढचे ५ दिवस महाराष्ट्रातच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस असेल.

यासोबतच मुंबईला जारी करण्यात आलेला रेड अलर्ट आता शुक्रवार सकाळी साडेआठ वाजेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. मुंबई शहर, उपनगर परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झालेली आहे. याशिवाय मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वेही काही मिनिटं उशिराने धावत आहे.

बुधवारपासून महाराष्ट्रातील विविध भागात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी, 28 जुलै रोजी मुंबईतही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अत्यावश्यक काम असेल तेव्हाच लोकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या 13 तुकड्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा

मुंबईत शुक्रवारीही रेड अलर्ट, बुधवारपासून पावसाचा जोर कायम

कच्चा रस्ता, रुग्णालयात डॉक्टर नाही, अखेर गरोदर महिलेने प्राण सोडले

पुढील बातमी
इतर बातम्या