मेट्रो (metro) च्या कामाचा आता मुंबईकरांना आणि मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) चांगलाच मनस्ताप होत आहे. मुंबई (mumbai) त सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी तर होत आहेत. पण त्याबरोबर पाण्याच्या जलवाहिन्याही मोठ्या प्रमाणावर फुटत आहेत. जलवाहिन्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तर जलवाहिन्यांचंही मोठं नुकसान होत आहे. जलवाहिन्या फुटल्याने नागरिकांनाही नाहक त्रास होणयासह मुंबई महापालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
कुलाबा ते दहिसर-ठाण्यापर्यंत मेट्रोची कामे सुरू आहेत. मागील ३ वर्षात मेट्रो (metro) साठी करण्यात येत असलेल्या खोदकामामुळे २५ ते ३० जलवाहिन्या फुटल्या आहेत. मागील आठवड्यातत वेरावली येथे जलवाहिनी (फुटून हजारो लिटर पाणी (water) वाया गेले. या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचा खर्च आता मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) मेट्रोकडून वसूल करणार आहे. जलवाहिन्या फुटत असल्याचा परिणाम मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. वेरावली येथे फुटलेल्या जलवाहिनीमुळे अंधेरी (andheri) पूर्व आणि पश्चिम तसेच घाटकोपर (ghatkopar) पश्चिम परिसरात चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला होता.
जलवाहिन्या फुटल्यानंतर पालिका प्रशासनाने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना समज दिली. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पालिकेच्या जलवाहिन्यांच्या जाळ्यांचा नकाशा दिलेला आहे. त्याचा नीट अभ्यास करूनच खोदकाम करावे, अशी सूचना केलेली आहे. मात्र, याचा काहीच उपयोग झालेला नाही. २०१७ ते २०१९ या तीन वर्षात दक्षिण मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाजवळ, वांद्रे (bandra), गोरेगाव (goregav), मालाड (malad), कांदिवली (kandivali), बोरिवली (boriwali), दहिसर (dahisar), परळ (paral), वरळी (worli), दादर (dadar) यासह विविध परिसरांत जलवाहिन्या फुटल्या आहेत.
मेट्रो (metro) मुळे जलवाहिन्या (फोडल्यामुळे अनेक परिसरात पाणीपुरवठा बंद करावा लागतो. जलवाहिनी फुटल्याचे लक्षात आल्यानंतरही पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) विभाग कार्यालयाला मेट्रोकडून कळवलं जात नाही. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर जलवाहिनी फुटल्याचे लक्षात येते. जल अभियंता विभागाने मेट्रो प्राधिकरणाला जलवाहिन्यांच्या अलाइन्मेंटचे नकाशे दिले आहेत.