अंबरनाथमध्ये गॅस गळती, ३४ जण रुग्णालयात दाखल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंबरनाथ इथल्या आनंद नगर एमआयडीसीतील आर के केमिकल या कंपनीत रासायनिक वायू गळती झाली आहे. गळतीमुळं आसपासच्या परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं खळबळ उडाली.

त्रास होत असलेल्या ३४ व्यक्तींना उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ एम.आय.डी. सी. प्लॉट क्रमांक एन/१०/१ येथील आर. के. केमिकल कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली. सल्फुरिक अॅसिड या केमिकलची गळती झाली.

गळतीनंतर आजूबाजूच्या परीसरातील लोकांना त्रास होऊ लागला. त्यांना श्वास घेणं कठीण झालं आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ३४ व्यक्तींना तात्काळा रुग्णालयात हलवण्यात आलं.

पोलिसांनी सांगितलं की, सर्वांवर उपचार सुरू आहेत आणि सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गळतीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गळती बंद केली. गळतीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.


हेही वाचा

गरबा कार्यक्रमावर पोलिसांची धाड, गुन्हा दाखल

पर्यटकांसाठी लवकरच राणीच्या बागेचे प्रवेशद्वार उघडण्याची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या