पक्ष्याचा जीव वाचवणं बेतलं जिवावर

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महालक्ष्मी - रेल्वे स्टेशनवर हाय व्होल्टेज वायरमध्ये अडकलेल्या घारीला वाचवताना अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले. शनिवारी रात्री महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळील यार्डतील हाय व्होल्टेज वायरमध्ये घार अडकली. घारीला वाचवायला गेलेल्या तिघा जवानांचा या वायरशी संपर्क झाला आणि तिघं जखमी झाले. तिघांवर जवळच्याच व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरुयेत. कुठलीच तयारी न करता हे तिघं रेस्क्यु ऑपरेशनमध्ये कसे सहभागी झाले, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

पुढील बातमी
इतर बातम्या