Worli bandh: महापुरुषांच्या अवमानाचे मुंबईतही पडसाद, आज वरळी बंद!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापुरुषांसंदर्भात सातत्यानं होणाऱ्या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात पुण्यानंतर आता मुंबईतील वरळीतही बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरूषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात मुंबईतील वरळी परिसरात बंद पाळला जात आहे.

वरळीतील आंबेडकरवादी आणि इतर संघटनांनी बंद पुकारला आहे. हा एकदिवसीय बंद असून सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत केला जाणार आहे.

मुंबईतील वरळी परिसरात आंबेडकरवादी आणि बहूजन महापुरुषांना मानणाऱ्या संघटनांसह छोटे पक्ष आणि वरळीकर जनता यांच्या वतीने आज वरळी बंद पाळण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडर यांचा अपमान करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार विरोधात आज बंद करण्यात येणार आहे. हा एक दिवसीय बंद सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीकडून १७ तारखेला आंदोलन केलं जाणार आहे. त्या अगोदर वरळीत हा बंद असणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून विविध संघटनांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सोशल मीडियावरही वादग्रस्त वक्तव्यांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर राज्यपालांना पदावरुन हटवण्याचीही मागणी करण्यात आली.


हेही वाचा

सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद, ‘या’दिवशी घेता येणार दर्शन

पुढील बातमी
इतर बातम्या