मुंबईच्या कुर्ला परिसरतील नवीन टिळक भागात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागलेली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. या इमारतीमध्ये काही नागरिक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दलची निश्चित माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीमधील महिला, लहान मुले हे खिडकीत येऊन मदतीसाठी हाक देत असल्याचं दिसून येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे.