वाहतुकदारांच्या संपाला मुंबईत संमिश्र प्रतिसाद

शुक्रवारपासून विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेतर्फे संपाची घोषणा करण्यात आली अाहे.  मुंबईसह देशभरातील मालवाहतुकदार या संपामधे सहभागी झाले असून दिवसभरात मुंबईमध्ये या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला.  कळंबोली, नवी मुंबई, पनवेलसह मुंबईच्या इतर काही भागात संपाचा परिणाम जाणवला. देशात डिझेलचे समान दर, जीएसटीवर सूट, विम्याचे दर कमी करावे, स्कूल बसला टोल माफी, पार्किंगसह अन्य सुविधांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू

इंधन दरवाढ, टोलदरातून सवलत मिळण्यासह अन्य मागण्यांसाठी वाहतुकदारांच्या संघटनांनी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. शुक्रवारनंतरही हा संप सुरुच राहणार असल्याचं संघटनांकडून सांगण्यात आलं आहे.  मात्र जीवनावश्यक वस्तू जसे भाजीपाला, दुध, फळे, औषधे, धान्याच्या, वाहतुकदारांना या संपातून वगऴण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर या संपाचा विशेष परिणाम होणार नाही. स्कूल बस असोसिएशनने तसंच पाणी टॅँकर वाहतुकदारांनी संपाला पहिल्या दिवशी पाठिंबा दिला. हा पाठिंबा केवऴ एकच दिवसासाठी होता. तर शनिवारपासून या दोन्ही सेवा सुरळीत होणार आहेत.

महाराष्ट्रभरात संपाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. मात्र सरकारकडून अजून कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. जोपर्यंत सरकारकडून काही ठोस पावलं उचलली जाणार नाहीत तोपर्यंत संप सुरुच राहणार. या संपामुऴं महाराष्ट्रात १६ लाख वाहनं उभी आहेत. परिणामी वाहतूक व्यवसायाचे राज्यात प्रतिदीन ६४० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. तर संपूर्ण भारतात या व्यवसायाला ४ हजार कोटींचा फटका बसणार आहे.

- बाल मल्कित सिंग, अध्यक्ष, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटना


हेही वाचा -

विषबाधा झालेल्या ८२ महिला कैद्यांची प्रकृती स्थिर

एल्फिन्स्टन महाविद्यालयाचा गलथान कारभार : १२७ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित


 

पुढील बातमी
इतर बातम्या