वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत (mumbai) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी या कारवाईत 426 रिक्षा जप्त केल्या आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांना (auto driver) पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी 29 नोव्हेंबरपासून विशेष कारवाई सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत विना परवाना, विना गणवेश, विना बॅच आणि विना परवाना रिक्षा चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, परफॉर्मन्स सर्टिफिकेट नसणे, रिक्षात जास्त क्षमतेहून प्रवासी घेऊन जाणे, नो पार्किंगमध्ये रिक्षा उभी करणे इ. वाहतूक नियम 2099 चे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच कोणताही रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास प्रवाशांनी पोलिस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडे तक्रार (complaint) दाखल करावी.

तक्रार करण्यासाठी 100, 103, 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा

सीएसएमटी येथे बेस्ट बसने एकाला चिरडले

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा जानेवारी अखेर पूर्ण ?

पुढील बातमी
इतर बातम्या