ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मागील काही दिवसांपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका पालिकेने लावला आहे. दोन दिवसांपूर्वी ऐरोलीतील अनधिकृत बांधकाम पालिकेने कारवाई करत तोडलं आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता जी विभाग अंतर्गत ऐरोलीतील सेक्टर 9 मध्ये दिवागांव तलावाशेजारी घर क्र. 440 येथे जी + 1 इमारतीचं बांधकाम अनधिकृतपणे सुरु केलं होते. या अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती.  संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवेले होते. 

या अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक कारवाई करून अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या मोहिमेसाठी 4 मजूर, 1 गॅसकटर, 2 इलेक्ट्रीक हॅमर वापरण्यात आले. यावेळी जी विभाग ऐरोली येथील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.  यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचं पालिकेने म्हटलं आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या