एअर इंडियाच्या मुंबईतील ३ घरांची अखेर विक्री

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दक्षिण मुंबईतील ज्युपिटर भवनातील एअर इंडियाच्या तीन घरांची अखेर विक्री करण्यात आली. महाराष्ट्राच्या महालेखापालांनी २४.३३ कोटी रुपयांना या घरांची खरेदी केली आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या लिलावावेळी  या घरांचं आरक्षित मूल्य ८ कोटीपेक्षा अधिक ठेवण्यात आलं होत.

पुन्हा लिलाव

यापूर्वी करण्यात आलेल्या लिलावात एअर इंडिया कंपनीला या घरांसाठी एकही खरेदीदार मिळाला नव्हता. त्यामुळं यावेळी पुन्हा लिलाव करण्यात आला. एअर इंडिया कंपनीवर सध्या ४८ हजार कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा आहे. आपल्या संपत्तीची विक्री करून एअर इंडिया सध्या आपल्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याच्या महालेखापाल कार्यालयासाठी दक्षिण मुंबईत कार्यालयाची आवश्यकता होती. त्यामुळं त्यांनी या लिलावात सहभाग घेतला. १८ मार्च रोजी या संपत्तीची उपनिबंधकांकडे नोंदणी करण्यात आली होती.


हेही वाचा -

मालाड स्थानकातील उत्तरेकडील पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद

रेल्वे स्थानकावरून काला खट्टा, लिंबू सरबत हद्दपार होणार


पुढील बातमी
इतर बातम्या