Amazon 19 सप्टेंबरपासून कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरसाठी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत ई-कॉमर्स कंपनी Amazon ने मोठा निर्णय घेतला आहे. Amazon ने जाहीर केले आहे की, ते 19 सप्टेंबर 2023 पासून कॅश ऑन डिलिव्हरी (COD) ऑर्डरसाठी पेमेंट म्हणून 2,000 रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद करेल.

आरबीआयने यापूर्वी मे महिन्यात भारतातील सर्वोच्च मूल्याच्या 2,000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली होती. तथापि, या नोटा बँकिंग प्रणालीत परत करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे.

Amazon च्या FAQ मध्ये दिलेल्या माहितीनुसार, 19 सप्टेंबर 2023 पासून, ते यापुढे या नोटा कॅश ऑन डिलिव्हरी (COD) ऑर्डर किंवा कॅशलोडसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 19 मे 2023 रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार पेमेंट म्हणून स्वीकारणार नाहीत. 

Amazon ने हे देखील स्पष्ट केले की 19 सप्टेंबर 2023 पासून ते Amazon द्वारे पूर्ण केलेल्या ऑर्डरसाठी रोख किंवा कॅश ऑन डिलिव्हरी (COD) पेमेंटसाठी 2,000 रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाहीत.

RBI ने 30 सप्टेंबर 2023 ही 2,000 रुपयांच्या नोटा बँकिंग सिस्टीममध्ये ठेवी किंवा एक्सचेंज म्हणून परत करण्याची अंतिम मुदत ठेवली आहे.


हेही वाचा

मुंबईत प्राण्यांसाठी दहनभूमीची व्यवस्था

मरिन ड्राईव्हचा हेरिटेज विकास!

पुढील बातमी
इतर बातम्या