10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रस्त्यावर रोषणाई

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव - गोरेगाव पश्चिममधील आझादनगर येथील रस्त्यावर तब्बल 10 वर्षांनंतर प्रकाश पडला. तब्बल 10 वर्षांनंतर नगरसेविका लोचना चव्हाण यांच्या प्रयत्नानं रस्त्यावर दिवे लागलेत. खासदार गजानन किर्तीकर यांच्याहस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. लाईट नसल्यामुळे वारंवार या रस्त्यांवर चोरीच्या घटना घडत होत्या. त्यातच दारूडे, गर्दूले यांचंही प्रमाण या ठिकाणी वाढलं होतं. यामुळे महिला आणि नागरिकांना येता जाता खुप अडचणींचा सामना करावा लागत असे. मात्र अखेर 10 वर्षांनी या रस्त्यावर दिवे लागले आणि नागरिकांना दिलासा मिळाला.

पुढील बातमी
इतर बातम्या