एस. व्ही. रोडची लागली 'वाट'

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वांद्रे - वांद्रे परिसरातील एस.व्ही. रोडची पुरती दुर्दशा झाली आहे. पावसाळा संपत आला असताना या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असा दावा पालिकेकडून दरवर्षी केला जातो. पण पहिल्या पावसाबरोबरच पालिकेचा हा दावाही वाहून जातो. पावसाळ्यात एस.व्ही. रोड मार्गावरही खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी डांबर किंवा काँक्रिट न वापरता पालिका प्रशासनाने पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. सततच्या वर्दळीमुळे हे पेव्हर ब्लॉक निखळले असून, त्यामुळे खड्ड्यांचा आकारही वाढला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या