करा, बँक आॅफ इंडियात नोकरीसाठी अर्ज, बघा किती आहेत जागा!

बँक आॅफ इंडिया, मुंबई झोनने सफाई कर्मचारी पदाच्या ९९ जागा भरण्यासाठी परिपत्रक काढलं आहे. या कर्मचारी भरतीस इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ आॅगस्ट अशी आहे. या जागांपैकी मुंबई साऊथ झोनमध्ये १९ पद, मुंबई नाॅर्थ झोनमध्ये २४ पद आणि नवी मुंबई झोनमध्ये ५६ पद भरण्यात येणार आहे.

अर्जाचा तपशील बघण्यासाठी 'इथं' क्लिक करा

https://www.bankofindia.co.in/pdf/2NOTICE-Safai-Karmachari.pdf

शैक्षणिक अर्हता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसंच उमेदवाराला स्थानिक भाषा येणंही आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. या पदासाठी अर्ज करण्याकरीता कुठलेही शुल्क घेण्यात येणार नाहीत.

'कसा' करायचा अर्ज?

सर्वात आधी बँक आॅफ इंडियाच्या वेबसाईटच्या होम पेजवर जा. करियर आॅप्शनवर क्लिक करून अॅप्लिकेशन फाॅर्म डाऊनलोड करा, हा फाॅर्म भरून सोबत आवश्यक कागदपत्रं जोडावी, त्यानंतर अर्ज पोस्टाद्वारे नमूद पत्त्यावर पाठवण्यात यावा, फाॅर्मवर ज्या झोनसाठी अर्ज करण्यात येत आहे, तो झोन स्पष्टपणे लिहा. नोकरी अर्ज 'सफाई कर्मचारी-शिपाई पदासाठी अर्ज', बँक आॅफ इंडिया, पोस्ट बाॅक्स नं: २३८, मुंबई, जीपीओ, मुंबई-४००००१ या पत्त्यावर पाठवावा.


हेही वाचा-

सिडकोकडूनच महारेराचं उल्लंघन, नोंदणीशिवाय काढली जाहिरात

१३ वर्षीय मुलानं तयार केलं कुरियर अॅप


पुढील बातमी
इतर बातम्या