धारावी पुनर्विकासाचे भूमिपूजन रद्द

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

‘धारावी रिडेव्हलपमेन्ट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड’ने (डीआरपीपीएल) धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने गुरुवारी भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र धारावी बचाव आंदोलनाने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. धारावी बचाव आंदोलनाने भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता.

धारावीकर बुधवारी सकाळपासून माटुंगा लेबर कॅम्प येथे लाक्षणिक उपोषणास बसले होते. डीआरपीपीएलने अखेर गुरुवारचा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केला.


पुढील बातमी
इतर बातम्या