भायखळ्यात नगरसेवक आपल्या दारी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भायखळा - येथील प्रभाग क्रमांक 207 च्या भाजपा नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी नगरसेवक आपल्या दारी हा नवीन उपक्रम प्रभागात सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आपल्या समस्या थेट नगरसेविकेकडे मांडता येणार आहेत.

जनतेशी संपर्क वाढावा आणि त्यांच्या समस्या सोडवता याव्यात म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी सांगितलं. या उपक्रमाची सुरूवात बुधवारी रात्री भाजपा कार्यालयात सभा घेऊन झाली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या