वाहनांच्या स्पीडला 'ब्रेक'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भट्टीपाडा - भांडुप पश्चिमेकडील जंगल-मंगल रोडवर वाहनांच्या वेगाला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. या रोडवर असलेल्या मनसेच्या शाखेसमोरील रस्त्यावर उतार असल्यानं वाहने प्रचंड वेगाने यायची. त्यामुळं रस्ता आेलांडताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. नागरिकांच्या मागणीनंतर पालिकेनं याठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दुपारी हे काम पूर्ण करण्यात आल्याने नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले. अशाप्रकारेच सर्वोदयनगरच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता अोलांडणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्यानं येथेही स्पीड ब्रेकर बसवला जावा, अशी मागणी स्थानिक गिरीश सातार्डेकर यांनी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या