मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी अाता एक खूशखबर अाहे. पालिकेने अापल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला अाहे. याबाबतचं परिपत्रक बीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलं अाहे.
पालिका कर्मचाऱ्यांंना महागाई भत्त्यातील वाढ जुलै २०१८ पासून लागू होणार अाहे. अाॅक्टोबर महिन्याचं वेतन महागाई भत्त्यातील वाढीसह मिळणार असून या वेतनात तीन महिन्यांची थकबाकीही समाविष्ट असणार अाहे. पालिकेच्या१ लाख १० हजार कर्मचाऱ्यांंना याचा लाभ मिळणार अाहे.
भत्ता १४८ टक्के
केंद्र सरकार अापल्या कर्मचाऱ्यांंचा महागाई भत्ता १४२ टक्क्यांवरून १४८ टक्के केला अाहे. केंद्र सरकारनुसारच बीएमसी महागाई भत्ता १४८ टक्के देणार अाहे. बीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाने अाॅक्टोबरच्या वेतनात वाढलेला महागाई भत्ता समाविष्ठ करण्यास मानव संसाधन विभागाला (एचआर) सांगितलं अाहे. जुलै ते सप्टेंबर या महिन्यांचाही वाढलेला महागाई भत्ता या वेतनात देण्याचे निर्देश दिले अाहेत.
बीएमसी कर्मचाऱ्यांंना बॉयोमेट्रीक हजेरीप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय पालिका अाधिकाऱ्यांनी घेतला अाहे. १ नोव्हेंबरपासून सर्व कर्मचाऱ्यांना बॉयोमेट्रीक हजेरीनुसार वेतन दिलं जाणार अाहे. त्यांच्या उपस्थितीनुसारच वेतन दिलं जाईल.
हेही वाचा -
लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये एक्स्प्रेसचं इंजिन स्टॉपरवर धडकलं
हजारो शिक्षकांना वेतनवाढीचा दिलासा