इमारतींसाठी नवी नियमावली जाहीर, रुग्ण आढळल्यास पूर्ण मजला होणार सील

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मुंबईतही चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी मुंबईत ८ हजारांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत ४० ओमिक्रॉन रुग्णांचे निदान झाले आहे.

हे लक्षात घेता मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता मुंबईतील इमारतींबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

नवी नियमावली

  • इमारतीतील एखाद्या मजल्यावर सक्रिय रुग्ण आढळल्यास तो मजला सील केला जाईल.
  • एखाद्या इमारतीत १० हून अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाणार.
  • कोरोना रुग्ण सापडलेल्या मजल्यावर घरातून बाहेर येण्यास आणि जाण्यास मज्जाव असणार.
  • ज्या मजल्यावर करोना रुग्णांची वाढ झाली आहे, अशी मजल्याच्या वरील आणि खालील मजल्यावरील सर्व रहिवाशांना पाचव्या किंवा सातव्या दिवशी करोना चाचणी करावी लागणार.
  • आरटीपीसीआर टेस्ट केल्याशिवाय इमारत उघडण्यात येणार नाही. किंवा अशी इमारत सक्तीने १४ दिवस क्वारंटाईन केली जाईल.
पुढील बातमी
इतर बातम्या