मुंबई महापालिकेच्या शाळांना लागलेली गळती रोखण्यासाठी प्रयत्न होत असतानाच आता खासगी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांप्रमाणे महापालिका शाळांचा लूक बदलून मुलांना या शाळांकडे आकर्षित करण्याकडे महापालिकेचा कल दिसून येत आहे. त्यासाठी महापालिका शाळांचा कायापालट केला जात आहे. शालेय इमारतींना आकर्षक रंगरंगोटी करून महापालिका शाळांची पटसंख्या वाढेल की कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या शाळा खासगी संस्थांच्या घशात घातल्या जाणार? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
किती विद्यार्थी?
महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमधील शिक्षण अधिक आनंददायी व्हावं, तसंच मनपा शाळा इमारतींची स्वतंत्र ओळख तयार व्हावी; या उद्देशाने गेल्या ३ वर्षांपासून नियोजनबद्ध रितीने कामे करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिकेच्या अनेक शाळांची मोठी दुरुस्ती कामे (मेजर रिपेअर वर्क) हाती घेण्यात येत आहेत. तर काही इमारतींचं पुनर्बांधकाम (रिकन्स्ट्रक्शन) देखील करण्यात येत आहे. यानुसार आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ४ शाळांचे पुनर्बांधकाम पूर्ण झालं असून ६२ शाळांची मोठी दुरुस्ती कामे पूर्ण झाली आहेत.
कुठल्या शाळांचा कायापालट?
चेंबूर स्टेशनजवळील मनपा शाळा असो, कुर्ल्यातील संघर्ष नगर मधील मनपा शाळा किंवा कुरार गावातील मनपा शाळा असो; प्राधान्याने पिवळ्या व तपकिरी रंगांत न्हाऊन गेलेल्या या इमारती सध्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आर्थिक वर्ष २०१७ – १८ मध्ये ४ मनपा शाळा इमारतींच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण झालं आहे. या व्यतिरिक्त तब्बल ६२ शाळा देखील दुरुस्तीनंतर नवीन रंगरुप घेऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आनंददायी करण्यास सज्ज झाल्या आहेत.
सर्वाधिक शाळा एम/ पश्चिम विभागात
पुनर्बांधणी केलेल्या शाळांमध्ये शिवाजी नगर परिसरातील एका शाळेसह, 'पी उत्तर'विभागातील २ शाळा; तर 'एफ दक्षिण'विभागातील एका शाळेचा समावेश आहे. तसंच दुरुस्ती कामासह आकर्षक रंगरंगोटी केलेल्या ६२ शाळांमध्ये सर्वाधिक म्हणजे ७ शाळा 'एम/ पश्चिम' विभागातील आहेत. त्या खालोखाल 'एम पूर्व' विभागातील ६ शाळांचाही यात समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली.
आणखी काय सुविधा?
शाळांचं पुनर्बांधकाम करताना, तसंच मोठी दुरुस्ती कामे हाती घेताना 'शिक्षण हक्क कायदा'मधील विविध तरतूदींची अंमलबजावणी करण्याची काळजी देखील घेण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी -विद्यार्थिंनींसाठी स्वतंत्र शौचालये, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र शौचालये, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शाळेच्या परिसरात 'रॅम्प' सारख्या आवश्यक त्या सोयी सुविधा, साधारणपणे प्रत्येक ४० विद्यार्थ्यांमागे एक शौचकुप, आवश्यकतेनुसार अतिरिक्त वर्ग खोली इत्यादी बाबींचा समावेश असल्याची माहिती जऱ्हाड यांनी दिली आहे.