मुंबईतील जलस्रोतांचे लवकरच 'मॅपिंग' होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - विकास प्रक्रियेमुळे मुंबईतील विहिरी, बोअरवेल, हायड्रंट हे पाण्याचे स्रोत नष्ट होतायत. शिवाय शहर आणि उपनगरांत आग लागण्याचे प्रमाण वाढलेय. अशा आपत्कालीन परिस्थितीत या स्रोतांची गरज भासते. त्यामुळे त्यांची निश्‍चित ठिकाणं समजण्यासाठी 'मॅपिंग' करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय.

मुंबईत 10 हजार 843 वॉटर हायड्रंट आहेत. त्यापैकी एक हजार 353 हायड्रंट सुरू आहेत. उर्वरित नऊ हजार 290 हायड्रंट निकामी झालेत. त्यातील काही जमिनीत गाडले गेलेत. शिवाय विकास प्रक्रियेत काही नष्ट झालेत. तशीच स्थिती विहिरी आणि बोअरवेलची आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा वापर करावा लागतो. सध्या जलस्रोतांची पुरेशी माहिती पालिकेकडं नाही. त्यामुळे त्यांचे नकाशे तयार करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. यामुळे त्यांचे निश्‍चित ठिकाण आणि स्थिती कळू शकेल. त्यांचा होणारा वापर आणि गैरवापर याविषयीची माहितीही समजेल. वॉटर हायड्रंट तसंच इतर जलस्रोतांची माहिती जमा झाल्यानंतर ती आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या संकेतस्थळावर टाकावी, असे आदेश पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी अग्निशमन दलाला दिले आहेत. त्यामुळे आग लागल्याचं कळताच जवळपास असलेल्या जलस्रोतांची माहिती तात्काळ कळू शकणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या