अखेर अंधेरी रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमण मुक्त!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी पश्चिम येथील मेट्रो रेल्वे खालील जे.पी. मार्गसह स्थानक परिसरातील सर्व फेरीवाल्यांसह अतिक्रमणांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. जोपर्यंत या रस्त्यांवरून रिक्षा सुरळीत धावत नाहीत, तोपर्यंत येथील कारवाई सुरुच राहणार असल्याचे के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले.

अजोय मेहतांची धडक मोहीम

मुंबईतील रस्त्यांवरील तसेच पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानंतर धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार परिमंडळ उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने धडक कारवाई केली. अंधेरी पश्चिम येथील मस्जिद गल्ली अर्थात चप्पल गल्लीसह रेल्वे स्थानक परिसरातील सर्व फेरीवाल्यांसह अतिक्रमणांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

रिक्षा वाहतूक होणार सुरळीत

यावेळी रेल्वे स्थानक परिसरातील १० स्टॉल्सह ८० वाढीव स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली आली. या सर्व भागांमध्ये फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. त्यामुळे रिक्षा वाहतुकीला मोठा अडसर निर्माण होत होता.

रोज होणार कारवाई

सोमवारी सर्वात प्रथम याठिकाणी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारही येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून ही कारवाई दररोज सुरू राहणार आहे, असे के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा

रेल्वे स्थानकांच्या अतिक्रमणांवर महापालिकेची नजर

पुढील बातमी
इतर बातम्या