व्हेंटिलेटरसाठी लवकरच पालिकेची हेल्पलाइन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची सोय नाही वा काही ठिकाणी व्हेंटिलेटर बंद आहेत. रुग्णांना वेळेत व्हेंटिलेटर न मिळाल्यानं जीव गमवावा लागत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यापुढे मात्र रूग्णांना त्वरीत व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणं रुग्णालयांना सोपं होणार आहे. कारण पालिकेनं व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड्सची माहिती पुरवण्यासाठी तसंच व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी नगरसेविका अनुराधा पेडणेकर यांना दिलेल्या अभिप्रायात ही माहिती दिली आहे. पेडणेकर यांनी याप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. स्वयंसेवी संस्थांमार्फत ही सेवा सुुरू करण्यात येणार असून 24 तास उपलब्ध असणार आहे. ज्या रुग्णालयातील व्हेंटिलेटर बंद आहेत, त्या व्हेंटिलेटरची त्वरेनं दुरूस्ती करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या