पावसाचे पाणी जातेय वाया, तलाव भरूनही महापालिका चिंतेत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी लावलेली असून मोडक सागर तलाव शनिवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास ओसंडून वाहू लागला आहे. तानसा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. हा तलाव भरण्यास दीड मीटर पातळीची कमी आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातच दोन तलाव 'ओव्हरफ्लो' होत आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार असली, तरी महापालिकेचे अधिकारी मात्र तलाव एवढ्या लवकर भरत असल्याने चिंतेत आहेत.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी आदी धरण तसेच तलावांमधून दरदिवशी 3750 दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे मुंबईकरांची वर्षाची तहान भागवण्यासाठी 1 लाख 44 हजार कोटी लिटर एवढ्या पाण्याची गरज आहे. त्यातुलनेत सध्या 89,938 कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा जमा आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणी साठा दुप्पट, तिप्पट आहे.

मोडकसागर 15 दिवस आधीच भरले

मोडकसागर आणि अप्पर वैतरणा या दोन्ही धरणांमधून मुंबईला होणाऱ्या 375 कोटी लिटर अर्थात 3750 दशलक्ष लिटर पाण्यापैकी  108 कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा होतो. यापैकी मोडक सागर धरण हे शनिवारी पहाटे भरले आहे. मागील वर्षी हे धरण 1 ऑगस्ट 2016 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास भरले होते.

तलाव सप्टेंबर महिन्यात भरणे फायद्याचे

महापलिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते जेवढी धरणे लवकर भरतील, तेवढे आपले नुकसान अाहे. धरणे लवकर भरल्याने ते पाणी सोडून द्यावे लागत आहे. त्यामुळे तलावे व धरणे टप्प्याटप्प्याने भरल्यास पावसाच्या पाण्याचा वापर करता येतो आणि पावसाचे पाणी सोडूनही द्यावे लागत नाही. परंतु धरणे वेळेआधी भरल्यास त्या पाण्याचा वापर आपल्याला करता येत नाही. ते पाणी सोडून दिल्यामुळे वाया जाते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास...

महापालिका उपायुक्त रमेश बांबळे यांनी पहिले धरण लवकर भरले ही महापालिकेसाठी सामाधानाची बाब असल्याचे सांगितले. पावसाचा जोर नाशिक पट्यात अधिक आहे. त्यामुळे अशाचप्रकारे पाऊस राहिल्यास उर्वरीत धरणे लवकर भरले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अर्थात आजच्या घडीला तलाव क्षेत्रात 62 टक्के पाणी साठा दिसत असला, तरी  आमच्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी जो पाणी साठा असेल तोच वर्षभराच्या नियोजनाचा भाग असतो. त्याच आधारे पुढील वर्षीचे पाण्याचे नियोजन केले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

तलाव व धरणांची शनिवारपर्यंतची पाण्याची पातळी

तलाव-धरणांची नावे

तलाव भरण्याची पूर्ण पातळी (मीटर)

सध्याची पाण्याची पातळी (मीटर)

 दररोजचा पाणीसाठा(द. लि.)

मध्य वैतरणा

603.51

598.79

 1080

मोडकसागर

163.15

163.05

-----

तानसा

128.63

127.16

400

मध्य वैतरणा

285.00

282.40

300

भातसा

142.07

127.90

2012

विहार

80.12

139.17

76.88

135.88

90

18

तुळशी

पुढील बातमी
इतर बातम्या