बोरिवलीत 4 मजली इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भिती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई-बोरिवलीत 4 मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळत आहे. बोरीवलीतल्या साईबाबा नगरमधील गितांजली ही इमारत दुर्घटना घडली. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी इमारत कोसळल्याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाला लेव्हल 2 चा कॉल मिळाला होता.

बोरिवलीतील साईबाबा नगरमधील गितांजली नावाची ही इमारत आहे. तळमजला आणि तीन मजले अशी ही इमारत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारत जखमी झाल्याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.


पुढील बातमी
इतर बातम्या