मुंबईतील भायखळा प्राणिसंग्रहालय म्हणून्र प्रसिद्ध असणाऱ्या वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणी संग्रहालयात नववर्षाच्या सुरुवातीस रविवारी (१ जानेवारी) एका दिवसातील विक्रमी १३.७८ लाख रुपयांचा महसूल गोळा झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेना(ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी पेंग्विनवरून होणाऱ्या विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.
“राजकीय विरोधक त्यांच्या द्वेषपूर्ण विचारातून मला अनेकदा यावरून नावे ठेवतात. त्यांनी बातमी जरूर वाचा! वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील मुंबई प्राणिसंग्रहालयात उद्धव ठाकरे आणि मी मुंबई मनपाच्या माध्यमातून जे काही साध्य करण्याचा प्रयत्न केला त्याचा अभिमान आहे.” असं आदित्य ठाकरेंनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
नववर्षाच्या सुरुवात रविवाराने झाल्याने प्राणिसंग्रहालयास ३३ हजार पर्यटकांनी भेट दिली आणि हा एकदिवसीय पर्यटकांच्या संख्येतील नवा विक्रम झाला. कारण, या अगोदर ६ नोव्हेंबर रोजी ३१ हजार ८४१ पर्यटकांनी प्राणिसंग्रहलायस भेट दिली होती. तेव्हा ११.१३ लाख रुपयांचा महसूल गोळा झाला होता. पर्यटाकांची प्रचंड संख्या पाहता प्राणिसंग्रहलाय व्यवस्थापनाने मुख्य प्रवेशद्वार निर्धारित वेळेच्या म्हणजे सांयकाळी ५ वाजण्याच्या १५ मिनिटे अगोदरच बंद केले होते. कारण, प्राणिसंग्रहालयातील गर्दीचे व्यवस्थापन करणे अवघड झाले होते. अनेक पर्यटकांनी आल्या पावली मागे फिरावे लागल्याचेही दिसून आले.
नाताळच्या दिवशी राणीच्या बागेत ३१ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या. तर, गुरुवारीही २३ हजारांहून अधिक पर्यटकांची राणी बागेत उपस्थिती होती. त्यामुळे दररोज ७ ते ११ लाखांहून अधिक महसूल प्रशासनाला मिळल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय उद्यानातील मुख्य आकर्षण हे सिंह सफारी असून दररोज १ हजारांहून अधिक तिकिट विकली गेली. तर एक लाखांहून अधिक महसूल राष्ट्रीय उद्यानाला मिळला.
हेही वाचा