राणी बागेत लवकरच पेंग्विन भेट

  • सतीश केंगार & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भायखळा - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालात जुलैमध्ये दक्षिण कोरियाच्या सेऊल येथील आठ पेंग्विन आणण्यात आले होते. पण ते अजूनही पाहणीकरता ठेवण्यात आलं नसल्यानं मुंबईकरांमध्ये पेंग्विना पाहण्याची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे लोकांची उत्सुकता लक्षात घेऊन येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पेंग्विन नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होतील अशी माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक संजय ​त्रिपाठी यांनी दिली. वाताअनुकूलीत वातावरणात राहण्याची सवय असलेल्या पेंग्विनसाठी कुत्रीम स्वतंत्र संरक्षित आणि वातानुकूलित जागा तयार करण्याचं काम सुरू असल्याचंही त्रिपाठी यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या