चर्नीरोड रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा भाग कोसळला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चर्नीरोड रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा भाग शनिवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी झाले. हा पूल 40 वर्ष जुना आहे. या पुलाची दुरवस्था झाली असून स्थानिकांकडून याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिकेडून याकडे दुर्लक्षच केले जात होते. या पुलावर दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात होती.

शनिवारी पुलाच्या 15 पायऱ्या कोसळल्या आणि ही शक्यता खरी ठरली. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शनिवारी सकाळी या पुलाला भेट देत पुलाची पाहणी करत हा धोकादायक पूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना केल्या होत्या.

हा पूल कोसळला तेव्हा जास्त वर्दळ नसल्याने मोठी हानी झाली नाही. आता पुलाचा भाग कोसळल्यानंतर तरी पालिकेला जाग येते का आणि जुना पूल पाडून नवीन पूल बांधला जातो का हाच प्रश्न आता स्थानिक आणि प्रवासी विचारत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या