Mumbai Local News : 6 व्या मार्गीकेमुळे जोगेश्वरी स्थानकावरील मधला फूट ओव्हर ब्रिज बंद

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

MUTP फेज II अंतर्गत मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे काम पश्चिम रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे, सध्या सुरू असलेल्या या कामाच्या संदर्भात, जोगेश्वरी स्थानकावरील मिडल फूट ओव्हर ब्रिज ते पूर्व बाजूस पाथवेद्वारे जोडणारा सध्याचा 3 मीटर रुंद मार्ग 2 मार्च ते 31 मार्च या कालावधीत बंद राहील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे संबंध अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

जोगेश्वरी (पूर्व) येथील प्रस्तावित 6व्या मार्गिकेच्या अलाइनमेंटमध्ये येणारी जुनी आरआरआय इमारत मोडकळीस आणण्यासाठी रेल्वेने हा निर्णय सध्याच्या मार्गात बदल करण्यासाठी घेतला आहे.

या कालावधीत, प्लॅटफॉर्म क्रमांक 1/2 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 3/4 वर मधला फूट ओव्हर ब्रिज (FOB) वापरला जाऊ शकतो.

स्थानकाच्या पूर्व बाजूने प्रवास करण्यासाठी प्रवासी दक्षिण फूट ओव्हर ब्रिज वापरू शकतात. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल अत्यंत खेद वाटतो, असे रेल्वेने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.


हेही वाचा

मध्य रेल्वेची १२ आणि १५ डब्यांची लोकल ट्रेन आता एकाच हॉल्ट बोर्डवर थांबणार

पुढील बातमी
इतर बातम्या