पार्कसाइटमध्ये पाण्याचं राजकारण

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

विक्रोळी - पार्कसाइट परिसरात अनेक वर्षांपासून स्थानिकांना पाणी समस्या सतावत होती. पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रात्री-बेरात्री येणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवल्याचा दावा स्थानिक नगरसेविका करत आहेत. मात्र फक्त मतांसाठी ही अशी कामं केली जातात. निवडणूक संपली की पुन्हा मध्यरात्रीच पाणी येणार, असं स्थानिक रहिवासी नंदा चाळके यांनी सांगितलं.

कातोडीपाडा येथील पाण्याच्या टाकीला अत्याधुनिक पाण्याचा पंप बसवण्यात आलाय. त्यामुळे आता नियमितपणे संध्यासाळी सात वाजता पाणी येऊ शकेल. पूर्वीसारखं रात्री-बेरात्री पाणी येण्यामुळे रहिवाशांचे होणारे हाल आता होणार नाहीत, असा दावा नगरसेविका डॉ. भारती बावदाणे यांनी केलाय. येथे आनंदगड आणि वर्षानगर अशा दोन पाण्याच्या टाक्या आहेत. तरीही पाणी वेळेत येत नव्हतं. आता मात्र जसजशा निवडणुका जवळ येताच राजकीय पक्ष कामाला लागलेत, अशी स्थानिकांत चर्चा आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या