कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी होत असल्याचं चित्र असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत आता ३९७ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता ऐन सणासुदीत कोरोना पुन्हा परतण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे कोविड नियम पाळण्याचे मुंबई महापालिकेनं आवाहन केलं आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी कोरोना नियमांसोबतच साजरी करावी लागणार आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. दरम्यान २८ जुलैला मुंबईत ४०४ रूग्णांची नोंद झाल्यानंतर, मुंबईतल्या रूग्णांची संख्या कमी होत गेली. मात्र, काल पुन्हा एकदा रूग्णवाढ झाल्याचे पाहायला मिळाली.
गुरुवारी दिवसभरात ३९७ रूग्णांची नोंद झाली असून, ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा मुंबईकरांची चिंता वाढली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर रूग्णवाढ होत असल्याने यंदाही सणांवर कोरोनाचे सावट आहे.
कोरोनाचा धोका वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा दिला आहे. यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी कोरोना नियमांसोबतच साजरा करावा लागेल, असे म्हटले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात काळजी घेण्याची आवश्यकता आहेत. तशा सूचना आरोग्य मंत्रालयाने केल्या आहेत. लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि कोरोना नियम पाळणं गरजेचे आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, केरळसह महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची सूचना करण्यात आल्या आहेत.
देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. आता तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. आता गणपती उत्सव काही दिवसांवर आहे. कोरोना रुग्णसंख्येत नेहमीच सणासुदीनंतर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणे गरजेचं आहे, असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. लसीकरण झाल्यानंतरी मास्क आणि करोना नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे, असेही त्यांन स्पष्ट केले आहे. केरळमधील करोना स्थितीवरही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.