मुंबईतल्या 'या' खाजगी रुग्णालयांमध्ये दिली जाईल कोरोना लस

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना लसीचा तिसरा टप्पा १ मार्चपासून संपूर्ण देशात सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसर्‍या टप्प्यात कोरोना लसीपासून सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेजे रुग्णालयात कोरोनायरसची पहिली लस घेतली.

तिसरा टप्प्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना कोरोना लस देण्यात येईल. तसंच इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांपर्यंतच्या वयातील लोकांनाही लस दिली जाईल.

कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील खासगी रुग्णालयांची यादीही केंद्र सरकारनं जाहीर केली आहे. कोरोना लसीसाठी सरकारनं खासगी रुग्णालयांना २५० रुपये दर आकारण्याचे आदेश दिले आहेत.

खालील खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस दिली जाऊ शकते.

    • शुश्रुषा रुग्णालय, विक्रोळी
    • के. जे. सोमय्या रुग्णालय
    • डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालय
    • वॉकहार्ट रुग्णालय
    • सर एच. एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय
    • सैफी रुग्णालय
    • पी. डी. हिंदुजा रुग्णालय
    • डॉ. एल. एच. हिराचंदानी रुग्णालय
    • कौशल्य मेडिकल फाऊंडेशन
    • मसीना रुग्णालय
    • हॉली फॅमिली रुग्णालय
    • एस. एल. रहेजा रुग्णालय
    • लिलावती रुग्णालय
    • गुरु नानक रुग्णालय
    • बॉम्बे रुग्णालय
    • ब्रीच कँडी रुग्णालय
    • फोर्टिस, मुलुंड
    • द भाटिया जनरल रुग्णालय
    • ग्लोबल रुग्णालय
    • सर्वोदय रुग्णालय
    • जसलोक रुग्णालय
    • करुणा रुग्णालय
    • एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालय
    • SRCC चिल्ड्रन्स रुग्णालय
    • कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय
    • कॉनवेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन रुग्णालय
    • सुरुणा शेठिया रुग्णालय
    • हॉली स्पिरीट रुग्णालय
    • टाटा रुग्णालय

हेही वाचा

पश्चिम उपनगरात कोरोनामध्ये ३० टक्क्यांची वाढ, 'हे' ५ वॉर्ड ठरत आहेत हॉटस्पॉट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची लस

पुढील बातमी
इतर बातम्या