कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट, IMA कडून अॅडव्हायजरी जारी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चीनमध्ये कोरोना महामारीने पुन्हा कहर केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे. शेजारील देशातील बिघडलेली परिस्थिती पाहून भारत सरकारनेही पावलं उचललायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनही अलर्ट मोडवर आलं आहे. कोविड-19 संदर्भात IMA नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. असोसिएशनने जनतेला आवाहन केले आहे की तात्काळ प्रभावाने प्रत्येकाने कोविड पालन करावे. लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IMAने जारी केलेले निर्देश

  • सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरावा.
  • सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.
  • नियमितपणे साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात धुणे.
  • विवाह, राजकीय किंवा सामाजिक सभा इत्यादी सार्वजनिक मेळावे टाळावेत.
  • आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा.
  • ताप, घसादुखी, खोकला, लूज मोशन इत्यादी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • शक्य तितक्या लवकर तुमचे कोविड लसीकरण करा.
  • वेळोवेळी जारी केलेल्या सरकारी सल्ल्यांचं पालन करा.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च (ICMR) चे डॉ. समीरन पांडा यांनी फर्स्टपोस्टला सविस्तर मुलाखत दिली. भारतात भविष्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चीनसारखी झपाट्याने वाढ होईल का असं डॉ. पांडा यांना विचारलं असता, ते म्हणाले की, जे काही चीनमध्ये घडतंय, ते भारतात होईलच असं मानणं चुकीचं ठरेल.

दरम्यान, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोविड १९ च्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणांवर मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे.


हेही वाचा

देशात वाढतंय कोरोनाचं संकट, 'या' ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला!

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! केंद्र सरकारही अलर्ट, राज्यांना निर्देश

पुढील बातमी
इतर बातम्या