साकिनाका इथं सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील अंधेरी साकिनाका परिसरात एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात ५ जण जखमी झाले आहेत. तर यात एकाचा मृत्यू झाल्याचं देखील समोर येत आहे.

साकिनाका परिसरातील आनंद भुवन या चाळित हा स्फोट झाला आहे. या स्फोटात ५ जण जखमी झाले आहेत. तर एका १५ वर्षाच्या मुलीचा यात मृत्यू झाला आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जखमींची नावं खालीलप्रमाणे

  • अनीसा खान
  • आसमा
  • रिहान
  • सानिया
  • शीफा


पुढील बातमी
इतर बातम्या