डबेवाल्यांची साफ सफाई !

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गिरगांव - गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच मुंबई स्वच्छ,सुंदर ठेवण्यासाठी मुंबईचे डबेवाले "स्वच्छता अभियान "राबवणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होते. तसंच निर्माल्यही गणेश विसर्जनासह समुद्रात टाकले जाते. त्यामुळे  गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात प्रदुषण आणि अस्वच्छता होते. ते प्रदुषण आणि अस्वच्छता कमी करण्यासाठी मुंबईचे डबेवाले "गिरगाव चौपाटी"साफसफाई अभियान राबवणार आहे. हे अभियान डबेवाले संस्थेचे अध्यक्ष श्री.भाऊसाहेब करवंदे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणार आहे. या अभियानात ४० ते ५० डबेवाले भाग घेतील. या अभियानाला " दीदी ( मायदीदी डॉट ईन") ही साफसफाई क्षेत्रात काम करणारी संस्था सहकार्य करणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डबेवाल्यांना स्वच्छ भारत अभियानाचे अॅम्बेसेडर नियुक्त केले आहे, याची जाणीव डबेवाल्यांना आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या विश्वासाने मुंबईच्या डबेवाल्यांना स्वच्छते दुत नियुक्त केले आहे, त्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी मुंबईचे डबेवाले सतत प्रयत्न करत असतात. यासाठी डबेवाले कधी स्वत: हाती झाडू घेऊन साफसफाई करतो तर कधी स्वच्छतेचा संदेश मुंबईकरांना पोचवत असतो.  गणपती विसर्जनानंतर चौपाटी परिसरात पसरणा-या अस्वच्छतेमुळे मुंबईच्या किनार्यांचे सौंदर्य कमी होऊ नये हा उद्देश या स्वच्छता अभियानामागे आहे.

 

पुढील बातमी
इतर बातम्या