शॉर्ट सर्किटमुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कांदिवली स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यानं वाहतूक २० ते २५ मिनिट उशिरानं सुरू आहे. तसंच ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.

प्रवाशांची गर्दी

ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या शॉट सर्किटमुळं कांदिवली स्थानकासह उर्वरित स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड जमली आहे. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्यामुळं प्रवाशांना लेट मार्कचा सामना करावा लागत आहे.

दुरुस्तीचं काम हाती

दरम्यान, या ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटची माहिती मिळताच पश्चिम रेल्वे प्रशासनानं तातडीनं दुरुस्तीच काम हाती घेतलं आहे. मात्र, रेल्वे सेवा पुर्वपदावर कधी येणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.


हेही वाचा -

खोकल्याचं सीरपमुळे पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई


पुढील बातमी
इतर बातम्या