ऑनलाईन नोंदणी केल्यावरच मंत्रालयात प्रवेश

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्यांना यापुढे राज्य (maharashtra) सरकारच्या DigiPravesh या अॅपवर नोंदणी करून मिळणाऱ्या क्यूआर कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने (state government) घेतला आहे.

काहीतरी कामाचे निमित्त करून मंत्रालयात येणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांनाही यापुढे मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही.

मंत्रालयाची (mantralay) सुरक्षा आणि दररोज येणारे हजारो नागरिक व वाहनांना मंत्रालयात प्रवेश देण्यासंदर्भात सरकारने मंत्रालय सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत चेहरा पडताळणीच्या आधारे लोकांना मंत्रालयात प्रवेश देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या (project) दुसऱ्या टप्प्यात आता क्षेत्रीय अधिकारी आणि सामान्य नागरिकांना अॅप आधारित व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी DigiPravesh हा अॅप विकसित करण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या